माझ्या शिक्षक उपयोगी विध्यार्थीकेंद्री ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत.

आरसा बोलतो आरसा खेळतो

🌻क्र.६२ आजचा उपक्रम 🌻

☄☄ *उपक्रमाचे नाव*

_*आरसा बोलतो,आरसा खेळतो*_

☄☄ *हेतू*    

_*खेळातून मनोरंजनात्मक अभ्यास करता येणे*_

☄☄ *साहित्य*    आरसा 
व आवश्यक शब्द, चिञे, अंक..etc.

☄☄  *कृती*

☄  प्रथम मुलांचे गट करून घ्यावे.

☄ गटाप्रमाणे पूरक साहित्य मुलांना देणे .

उदा ... अंक , शब्द , मुळाक्षरे ,
ABCD  abcd....चिञे..etc..

टिप.. वरील शक्य तेवढ्या साहित्याँचे उलट लिखाण करून घ्यावे.

(शाळा नायरी मराठी ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी ..श्री नारायण नानाराव शिंदे )

☄ _*मला असे वाटते वर्गातील सर्व मुलांना नियोजित वेळेत आपआपल्या कुवत आणि गतिनुसार शिकण्याची संधी उपक्रमांमुळे मिळते.मुले स्वतःहून आवडीने तसेच कृतीतून शिकतात.*_

☄ आरसा मुलांना स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी ठेवावे.

☄ आरशात प्रत्येक शब्द , चिञे. मुलांना दाखवावे.

☄ मुलांना सुरूवातीला काही समजत नाही नेमक काय सुरू आहे ते पण या ठिकाणी शिक्षकांनी मार्गदर्शन करावे.

☄  नंतर मुले आवडीने जादू झाली ! जादू झाली असे म्हणून आनंदाने ओरडायला सुरूवात करतील.

☄ हा उपक्रम घेत असताना कोणती अक्षरे सारखी दिसतात.कोणत्या अक्षरांचा क्रम बदलतो. हे लक्षात आणून दिले पाहिजे ,

☄ अशा प्रकारे आरसा मुलांना बोलतोही आणि मुलांसोबत खेळतोही.

☄ वरील प्रमाणे अनेक घटक आपल्याला या प्रकारे घेता येतात.👇🏻👇🏻

_*NARAYAN SHINDE*_

*उदा*..  डावा.. उजवा 
पुढे ..मागे      वर.. खाली
उलटा..सुलटा...
उंच..लहान    

*अशा प्रकारे अनेक संकल्पना या उपक्रमातून स्पष्ट करता येतात.*

☄ शैक्षणिक साहित्य म्हणूनही आपण वापर करू शकतो. ( आरसा ) खर्च २० रु.( प्रत्येक गटासाठी) आणि कायम स्वरुपी.

*उपक्रम कसा वाटला हे आपण नक्कीच कळवा यात काही बदल आवश्यक असल्यासही कळवावे*

🎀🎀   *संकलन*  🎀🎀

_श्री नारायण नानाराव शिंदे_
    *शाळा नायरी मराठी*
   ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी 
   📞   *९४०५७३८८८३*
🌷 _मराठी शाळा वाचवली पाहिजे समूह_ 

_*मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण दिले पाहिजे*_

🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻🌷🌷

No comments:

Post a Comment