माझ्या शिक्षक उपयोगी विध्यार्थीकेंद्री ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत.

वाक्य तेच भाव वेगळे

🌲 *आजचा उपक्रम* 🌲

☄ *उपक्रमाचे नाव* 

_*वाक्य तेच भाव वेगळे*_

☄☄ *हेतू*  

एकच वाक्य आनंद , दुःख , राग अशा भावनेत बोलता येणे.
( अभिनय पण करून घेणे )

☄☄ *साहित्य* 
_*वाक्यपट्या*_

उदा.. तू आलास ..
    ....मी पास झालो..

☄ *कृती*   

☄☄ _टेबलावर काही वाक्यपट्या ठेवाव्यात_ .

☄☄ एक वाक्यपट्टी उचलून ते वाक्य वेगवेगळ्या भावनेने म्हणून दाखवावे.
( आनंद , दुःख  , राग )

     _*विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारे वाक्ये म्हणून दाखविण्यास सांगावे*_

☄☄ वेगवेगळ्या पध्दतीने म्हणून दाखविलेले एकच वाक्य लक्षपूर्वक ऐकण्यास सांगावे.

☄☄ एक वाक्य पट्टी उचलण्यास सांगावे .

☄☄ त्यावरील वाक्य वेगवेगळ्या पध्दतीने ( रागात , आनंदात , दुःखात) म्हणून दाखवण्यास सांगावे .

☄☄ या उपक्रमामुळे मुले चिकित्सक विचार करून अभिनयासह म्हणून दाखवतात.

*नमुना वाक्यपट्टी*

१) शाळा सुटली.
२ ) पक्षी आले.
३ ) वारा सुटला

_*आपणांस हा उपक्रम कसा वाटला ते नक्कीच कळवा* _

 🌻🌻 *संकलन* 🌻🀊
श्री नारायण नानाराव शिंदे
    शाळा  नायरी मराठी 
ता.संगमेश्वरषजि.रत्नागिरी 
    ९४०५७३८८३१
_*मराठी शाळा वाचवली पाहिजे समुह*_

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌻🌻🌻

No comments:

Post a Comment