माझ्या शिक्षक उपयोगी विध्यार्थीकेंद्री ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत.

जाळे फेका मासे पकडा

✍🏻 *उपक्रमाचे नाव*
_*जाळे फेका मासे पकडा*_
✍🏻 _*हेतू*_
_खेळातून अभ्यासाची गोडी लावणे._
✍🏻 *साहित्य*
मोठे टोप , पाणी , तयार केलेले फासा , प्लास्टिक पासून तयार केलेले साहित्य ( टाकाऊ अनेक वस्तू मिळतात )
उदा. बाँटलचे टोपन, खराब झालेले डबे, etc...
✍🏻 *कृती*
🎖 प्रथम मुलांना कोणतेही कल्पना न देता नियोजन करावे.
🎖 भरपूर साहित्य बसेल अशा टोपात पाणी भरून घ्यावे.
🎖 वर्गातील मधोमध पाण्यांनी भरलेला टोप ठेवावे.
🎖 पाण्यांनी भरलेल्या टोपात आवश्यक साहित्य टाकावे .
( वरीलप्रमाणे )
*मी श्री नारायण शिंदे शाळा* *नायरी मराठीत हा उपक्रम* *राबवला आहे. आणि यात सतत बदल करून अनेक घककांची संकल्पना स्पष्ट करत असतो.*
🎖 मुलांच्या हातात फास द्यावे.
व पाण्यात असणारे आकार, शब्द , अंक, संख्या , अक्षरे ...
यांचे नाव सांगावे .
🎖 नंतर मुलांना सांगितलेल्या नावाची वस्तू फासानी पाण्यातून बाहेर काढायला सांगावे.
( याठिकाणी प्रत्येकाला संधी देणे आवश्यक आहे.)
🎖 मुलांनाच नावे सांगायला सांगावे . ( एकाने वस्तूंचे नाव सांगावे व इतरांनी फासा पाण्यात टाकून वस्तू फाशांनी काढावी.)
मी,नारायण नानाराव शिंदे
या उपक्रमाचा उपयोग करून जवळजवळ २० घटक शिकवले आहेत. आणि ते घटक मुले आयुष्यात कधीही विसरू शकणार नाहीत.
🎖 जे विद्यार्थी फासा टाकून अचूक वस्तू बाहेर काढतो. त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करावे.
_जि.प.शाळा नायरी मराठी_
_ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी_
_*पण या मुलांना विशेषत्वानं समजून का घ्यायचं? आणि समजून घ्यायचं म्हणजे नेमकं*_ _*काय करायचं? याच्या बाबत अगदी स्पष्टता असायला हवी.*_
_*अगदी सोप्या भाषेत*_ _*ढोबळमानाने सांगायचं तर त्याला आपल्या वर्गाचा अभ्यासक्रम शिकवायचं हे आपल ध्येय.कुठ जायचं आहे हे ठरलंय; पण सुरूवात कोठून करायची हे तेवढंच ठामपणे माहिती असेल तर मधला प्रवास योग्य दिशेने आणि अपेक्षित गतीने होणार*_ 🙏🏻
🎖 अशा प्रकारे मुलांचे अभिनंदन करून प्रत्येक मुलाला संधी देऊन उपक्रम यशस्वी करता येतो.
✍🏻 या उपक्रमाव्दारे अनेक घटक शिकवता येतात.
*उपक्रम कसा वाटला हे आपण नक्कीच कळवा यात काही बदल आवश्यक असल्यासही कळवावे*
🎀🎀 *संकलन* 🎀🎀
_श्री नारायण नानाराव शिंदे_
*शाळा नायरी मराठी*
ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी
📞 *९४०५७३८८८३* 🌷 _मराठी शाळा वाचवली पाहिजे समूह_
_*मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण दिले पाहिजे*_
🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻🌷

No comments:

Post a Comment